माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १६ मार्च २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील युवतीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी खानजोडवाडी येथील तिघांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची येथे फिर्यादी राहण्यास आहे. खानजोडवाडी येथील आरोपी नं. १ अमर आप्पासो सूर्यवंशी याने फिर्यादीचे घरी येवुन तिला रिव्हॉलरचा धाक दाखवुन फिर्यादीचे मनाविरुद्ध जबरदस्तीन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केल्याची धमकी दिली.

तसेच शारीरिक संबंध ठेवत असताना नग्न फोटो काढून आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली. त्याच बरोबर आरोपी नं. 2 आप्पासो विठ्ठल सूर्यवंशी व आरोपी नं. ३ शालन आप्पासो सूर्यवंशी यांनी अमर बरोबर लग्न कर नाहीतर व्हिडीवो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.
याबाबत फिर्यादीचे फिर्यादीनुसार आरोपी नं. १ अमर आप्पासो सूर्यवंशी आरोपी नं. 2 आप्पासो विठ्ठल सूर्यवंशी व आरोपी नं. ३ शालन आप्पासो सूर्यवंशी यांच्या विरुद्ध भा.दं.स.कलम ३७६(2)एन, आर्म कलम ४, २५ प्रमाणे आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि वर्धन करत आहेत.
हे ही वाचा
आटपाडी : खानजोडवाडी येथील युवकाची फसवणूक : मुलीचे लग्न लावून देतो म्हणून १० लाख रुपयांचा घातला गंडा