Latest Marathi News

BREAKING NEWS

आम. अनिलभाऊ बाबर यांच्या मंत्रीपदासाठी रक्तानं पत्र लिहणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार

0 1,315

माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. १४ मार्च २०२३ I आटपाडी : खानापूर-आटपाडीचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर (Mla Anilbhau Babar यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा या मागणीसाठी शेटफळे गावचे वयोवृद्ध शेतकरी शिवाजी कृष्णा गायकवाड (वय.७१) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांना रक्ताने पत्र लिहले होते.

शिवाजी गायकवाड यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे खानापूर आटपाडीचे पाणीदार आमदार टेंभू योजनेचे जनक अनिल भाऊ बाबर (Mla Anilbhau Babar) यांना मंत्रीपद द्यावे. मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अनिल भाऊंना मंत्रीपद द्यावे आणि मतदारसंघाचा विकास साधावा अशा आशयाचे पत्र लिहिले आहे.

Manganga

याबाबत शिवाजी गायकवाड यांचा सांगली जिल्हा बँकेचे तानाजीराव पाटील (Tanajirao Patil Atpadi), शेटफळेचे नेते सोमनाथ गायकवाड, आटपाडीचे युवा नेते मनोज नांगरे-पाटील (Manoj Nangare-Patil Atpadi), यांनी शेटफळे येथे सत्कार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!