माणदेश एक्सप्रेस न्युज I दि १३ मार्च २०२३ I म्हसवड : धमक्यांना कंटाळून गळफास घेतलेल्या शेतकरी युवक नवनाथ मारुती दडस आत्महत्येप्रकरणी म्हसवड व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघी कॉन्स्टेबल बहिणींसह त्याच्या आई- वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
शिल्पा नवनाथ दडस (कॉन्स्टेबल, म्हसवड पोलीस ठाणे), तिची बहीण अनिता लाला गाडेकर (कॉन्स्टेबल, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे व त्यांचे वडील लाला नागू गाडेकर व आई सीताबाई लाला गाडेकर (सर्व रा. गाडेकरवस्ती, भाटकी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत युवकाची बहीण शांताबाई हिराचंद वलेकर (वय ३५, रा. कोथळे, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. नवनाथ दडस हा कोथळे, ता. माळशिरस येथे शेती करत होता. तो त्याची पत्नी शिल्पासह म्हसवड पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास असताना ऑक्टोबर २०२२ ते २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत म्हसवड व गाडेकरवस्ती भाटकी येथे संशयितांनी नवनाथ याला वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांना कंटाळून नवनाथ याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.