माणदेश एक्सप्रेस न्युज I १२ मार्च २०२३ I आटपाडी : आटपाडी आगाराच्या चालकाला रजा नाकारण्यात आल्याने आजारी पत्नीने आटपाडी आगार प्रमुख याच्या केबिन समोर झोपून निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. परंतु सदर महिलेवर आटपाडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे.
आटपाडी आगारा मध्ये विलास कदम हे चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक 6 मार्च रोजी पत्नी आजारी असल्याने बारामती येथील दवाखान्यात जाण्यासाठी दिनांक 12 व 13 अशी दोन दिवस रजा मागितली होती. पत्नी आजारी असल्याने चालक विलास कदम यांना आगार प्रसाशनाने रजा देवून त्यावर मार्ग काढणे आवश्यक असताना त्यांना रजा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांची आजारी पत्नी नंदिनी कदम यांनी आगार प्रमुखांच्या केबिन समोर झोपून निषेध आंदोलन केले होते.

याबाबत सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक स्वप्निल वसंतराव हसबे यांनी आटपाडी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून विलास कदम यांच्या पत्नी आटपाडी आगार या ठिकाणी येवून वाहतूक निरीक्षक विपुल संजय शिंदे व सहाय्यक वाहतूक अधिक्षक शिवराम माने यांना तुम्ही माझ्या पतीला रजा का दिली नाही या कारणावरून चिडून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळी करून त्या कार्यालयाच्या दरवाज्या समोर झोपल्या होत्या म्हणून फिर्याद दिली.