माणदेश एक्सप्रेस न्युज I १२ मार्च २०२३ I आटपाडी : आटपाडी आगाराच्या चालकाला रजा नाकारण्यात आल्याने आजारी पत्नीने आटपाडी आगार प्रमुख याच्या केबिन समोर झोपून निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी आगारा मध्ये विलास कदम हे चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक 6 मार्च रोजी पत्नी आजारी असल्याने बारामती येथील दवाखान्यात जाण्यासाठी दिनांक 12 व 13 अशी दोन दिवस रजा मागितली होती.

पत्नी आजारी असल्याने चालक विलास कदम यांना आगार प्रसाशनाने रजा देवून त्यावर मार्ग काढणे आवश्यक असताना त्यांना रजा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांची आजारी पत्नी नंदिनी कदम यांनी आगार प्रमुखांच्या केबिन समोर झोपून निषेध आंदोलन सुरू केले आहे. पत्नी आजारी असतानाही रजा नाकारणाऱ्या अधिकाऱ्यावर आगार प्रमुख कार्यवाही होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.