युवकांच्या सहभागाशिवाय राष्ट्राचा विकास होऊच शकत नाही : प्रा. विष्णू जाधव : श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याने श्रम संस्कार शिबीर कार्यक्रमाची सुरुवात
माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. ११ मार्च २०२३ I आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये दिंनाक १० मार्चला श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्रा विष्णू जाधव उपस्थित होते. कायर्क्रमाच्या अध्यक्षास्थानी आटपाडी बाजार समितीचे मा. सभापती भाऊसाहेब गायकवाड होते.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मधील तिसऱ्या दिवसाचे नियोजन श्रीमंत बाबासाहेब देशमुख या ग्रुपने केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेश्मा राजगे हिने केले. तसेच श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त कु. श्रेया झांबरे हिने मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रा. विष्णू जाधव यांनी “युवकांचे ग्रामीण विकासातील योगदान” या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, युवकांच्या सहभागाशिवाय राष्ट्राचा विकास होऊच शकत नाही. देशाचे भवितव्य बदलणे हे युवकच करू शकतात. तारुण्य काही काळापुरतेच असते. त्यामुळे जगाचा विकास करण्याची ताकद ही फक्त तरुणांमध्ये असते. त्यामुळे जगाचा विकास करायचा असेल तर माणसं पेरली पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड मार्गदर्शन यांनी, श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये आटपाडी तालुक्यामधील विविध तलाव, एसटी डेपो, पंचायत समिती, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य केल्यानेच त्यांना आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते म्हणतात असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक प्रा. सपकाळ, प्रा. मोरे या खरसुंडी गावचे सरपंच धोंडीराम इंगवले व ग्रामस्थ ही उपस्थित होते. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे व सरपंच धोंडीराम इंगवले यांनी केले. ग्रामस्थ ही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
युथ फाऊंडेशन मावळा प्रतिष्ठान यांच्या ढोल वादनाने खरसुंडी परिसर दणाणून गेला. यामुळे ग्रामस्थांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना याविषयी कुतूहल निर्माण झाले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्रीमंत बाबासाहेब देशमुख ग्रुप ने केले. तर प्रा. सदाशिव मोरे, प्रा.डॉ. धनंजय लोहार, प्रा. गणपतराव नांगरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.