आटपाडी : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे खरसुंडीत उद्घाटन संपन्न
माणदेश एक्स्प्रेस न्यूज I दि. ०९ मार्च २०२३ I आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात खरसुंडीत येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे, खरसुंडीचे लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले, जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे किशोर पुजारी, माजी उपसरपंच अर्जुन पुजारी, श्रीमती ताई पुजारी, धनंजय पुजारी, विलास कटरे आनंद पुजारी, विजयकुमार पुजारी, एकनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त डॉक्टर साधना पवार यांनी महिला व त्यांचे आरोग्य याविषयी खूप चांगले मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री किशोर पुजारी यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना राज्य व राष्ट्रीय पातळीवर गेल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले त्याचबरोबर मा.अमरसिंह बापू देशमुख यांच्या वाचन व आकलन उपक्रमाचेही कौतुक केले.
यावेळी प्राचार्य विजय लोंढे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. तर जागतिक महिला दिनानिमित्त बीकॉम भाग ३ ची विद्यार्थीनी कु. रेश्मा राजगे व बीएस्सी भाग ३ ची विद्यार्थीनी कु. श्रेया झांबरे यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजन समितीचे तसेच सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. सदरचे शिबीर हे दिनांक १४ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व दि. आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख, विलासनाना शिंदे यांच्या उपस्थित समारोप होणार आहे. या सात दिवसाची शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्रा.सदाशिव मोरे प्रा.गणपतराव नांगरे प्रा.डॉ.धनंजय लोहार प्रा.डॉ. किशोर जाधव व प्रा.हणमंत सावंत हे उत्तम नियोजन करत आहेत.