माणदेश एक्स्प्रेस न्युज I दि. ०९ मार्च २०२३ I आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील सविता कदम यांचा पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हस्ते प्रशंसापत्र व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.
सविता कदम या मुळच्या बनपुरी येथील आहेत. त्या मुंबई पोलीस दलात आरे पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पोक्सो गुन्हाचा उत्कृष्ट तपास अटक आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध असणारे सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

त्यांनी केलेल्या या कामगिरीची दखल पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी घेत त्यांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.