माणदेश एक्सप्रेस न्यूज I दि. ०९ मार्च २०२३ I आटपाडी : मुढेवाडीतील २५१५ योजने अंर्तगत सुरु असलेल्या सतोषा मंदिर ते राजगे घर सुरु असलेले रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे व अंदाजपत्राका नुसार होत नसल्याने याकामाबाबत गावातील माजी सरपंच व गावकरी यांनी रस्त्याच्या कामाबाबत दर्जा उपस्थित केला होता.
सदर रस्त्याच्या कामाबाबत माणदेश एक्स्प्रेस मध्ये बातमी ही प्रसिद्ध झाली होती. याबाबत मुढेवाडी ग्रामपंचायतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम करण्याबाबत नोटीस दिली आहे. यामध्ये सुरु असलेले रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे तसेच अंदाजपत्रकीय बाबीला धरून करणेत यावे. तसे न झालेस रस्ते कामाचे बील मिळणार नसल्याचे नोटीसीत नमूद केले आहे.