माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले आणि मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होवू लागला.
आटपाडी तालुक्यात ही महिला दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. येथील जवळे ज्वेलर्स व मल्टीपर्पज हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या महिलांचा जवळे उद्योग समूहाचे प्रसाद जावळे व सौ. मयुरी जवळे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या डॉ. साधना पवार, डॉ. अश्विनी मोरे, डॉ. शिल्पा भांबुरे, डॉ. सारिका देवडकर, डॉ. सुरेखा देशमुख, तसेच राजकीय क्षेत्रातील आटपाडीच्या माजी सरपंच सौ. वृषाली पाटील, अनिल पाटील, दिघंचीच्या सरपंच सौ. माधुरी मोरे, मनीषा पाटील, सुवर्णादेवी देशमुख, विजयमाला मोकाशी, मैनाताई गायकवाड, अंजली नामदास, वर्षाराणी कुंभार, ऋतुजा कुलकर्णी, पोलीस दलातील सुजाता जगदाळे, साधना शेंडगे, सविता गोधे, पंचायत समिती येथे सेवा बजावत असलेल्या स्वप्नजा पंचविशे, भारती भाबड, चैत्राली कुलकर्णी, दुर्गा पाटील, विद्याराणी मंडले यांचा सत्कार करण्यात आला.