Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी : खानजोडवाडी येथील युवकाची फसवणूक : मुलीचे लग्न लावून देतो म्हणून तब्बल १० लाख रुपये लाटले

0 6,283

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथील युवकाची दिघंची येथील कुटुंबीयाने मुलीचे लग्न लावून देतो म्हणून तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केली घटना घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, खानजोडवाडी येथे अमर आप्पासो सुर्यवंशी (वय 29) हा आपल्या कुटुंबीयास राहणेस आहे. अमर सूर्यवंशी याचे दिघंची येथे नानासो मोरे हे नातेवाईक आहेत. अमर सूर्यवंशी याचे मोरे यांच्या घरी येणे-जाणे असल्याने यातून नानासो मोरे यांची मुलगी स्नेहा मोरे हिच्याशी ओळख झाली. यातून दोन्ही कुटुंबीयकडून लग्नास होकार देण्यात आला.

अमर हा स्नेहा हिच्याशी लग्न करणार असल्यामुळे स्नेहा मोरे हिचा भाऊ अविनाश मोरे याने सोफा सेट व मोबाईल घ्यायचा आहे असे कारण देवून सुरुवातीला ७० हजार रुपये दिले. त्यांनतर वेळोवेळी स्नेहाचे वडील नानासो मोरे, भाऊ अविनाश मोरे, आई अलका मोरे, बहीण प्रतिभा जाधव यांनी अमर सूर्यवंशी यांच्या कडून रोख तसेच युपीआय द्वारे १०,०५,३३२/- रुपये घेतले.

परंतु नानासो मोरे यांनी मुलगी स्नेहा हिचे लग्न अमर सूर्यवंशी याच्या बरोबर लावून देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अमर सूर्यवंशी याने दिलेले पैसे मागण्यास सुरुवात केली असता सदर कुटुंबाने आत्महत्या करण्याची धमकी अमर सूर्यवंशी यास दिली आहे.

याबाबत अमर सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी 1) स्नेहा नानासो मोरे, 2) सौ, अलका नानासो मोरे, 3) अविनाश नानासो मोरे, 4) नानासो अर्जुन मोरे सर्व, रा, घनचक्कर मळा, दिघंची ता. आटपाडी 5) सौ. प्रतिभा संतोष जाधव, रा, महूद ता.सांगोला यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.