आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण मोफत दिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शाळेबाबत सांगणार आहोत जिथे अनेक प्रकारच्या सोईसुविधा विद्यार्थ्यांना मोफत पुरवल्या जातात. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार १ ते ६ लाखांपर्यंतची रक्कम दिली जाते.
या शाळेचं नाव श्रीमद यशोविजयजी जैन संस्कृत पाठशाळा असं आहे. ही गुजरातमधील मेहसाणा येथील १२५ वर्षे जुनी संस्था आहे. या शाळेतील पहिले विद्यार्थी योगनिष्ठ श्रीबुद्धिसागर सुरीश्वर महाराज होते.

संस्थानामधील प्रकाशभाई पंडित यांनी सांगितले की, या शाळेमध्ये दरवर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. शिक्षणा दरम्यान संस्थान विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये देते. चार वर्षांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना १ लाख आणि सह वर्षांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये दिले जातात.
कायदा आणि व्याकरणासह विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ लाख रुपये दिले जातात. अनेक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचं ज्ञान मिळावं यासाठी येथे १२ हजार पुस्तकं असलेलं ग्रंथालयसुद्धा आहे.
या शाळेमध्ये धार्मिक शिक्षणासह इंग्रजी, संगणक आणि संगीताचंही शिक्षण दिलं जातं. येथील विद्यार्थी देशातील इतर शाळांप्रमाणे अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकतात.