माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळा/वार्ताहर : सांगोला येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीला संस्थापक तथा शेकापचे नेते, माजी आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्याच्या ठरावाला वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी मंजुरी दिल्याची माहिती चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी दिली.
या नामांतरानुसार सांगोला सूतगिरणी ही ‘शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोले, ता. सांगोले, जि. सोलापूर’ या नावाऐवजी ‘डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या, सांगोले, ता. सांगोले, जि. सोलापूर’ या नावाने ओळखली जाणार आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या २२ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सूतगिरणीस भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

‘शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोले, ता. सांगोले, जि. सोलापूर’ या नावाऐवजी ‘डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या सांगोले,सांगोले, जि. सोलापूर’ असे नामांतर करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला होता. हा ठराव मंजुरीसाठी पी. शिवा शंकर आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार पी. शिवा शंकर आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य यांनी या नामांतर ठरावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.