माळशिरस : आम. राम सातपुते तुम्ही माळशिरस या राखीव मतदार संघातून निवडून आला असून तुम्ही तुम्ही डबल ढोलकी बंद करा, जितेंद्र आव्हाड साहेब बोलले ते बरोबर बोलले आहेत. आम्हाला या वादात पडायचे नव्हते परंतु तुम्ही प्रचंड दिशाभूल करत आहात.आप के कथनी और करणी मे दोगलापन है! अशी टीका डॉ. कुमार लोंढे यांनी आम. राम सातपुते यांच्यावर केली आहे.
याबाबत त्यांनी आम. राम सातपुते यांनी खुले पत्र लिहले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “जो धर्म जन्माने एखाद्याला ‘श्रेष्ठ’ आणि दुसर्यांला ‘नीच’ ठरवतो, तो धर्म नसून गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे. तुमचा सनातन धर्म हेच सांगतो अबाधित, रूढी परंपरा मानणारा कधीही न बदलणारा असा धर्म असता तर तुम्ही नक्कीच विधानसभेत गेला नसता बंधू! हे ही स्मरणात व आचरणात असावे. जो सनातन धर्म तुम्ही सांगत आहात उच्चार करत आहात हा सनातन म्हणजे मनुस्मृती चा धर्म आहे हे ही तुम्ही सांगितले पाहिजे. तुम्हाला त्याचा सार्थ अभिमान असणार आहे त्यात विशेष असे काही नाही.

राहिला प्रश्न आंबेडकरांचा तर आंबेडकर हे नाव स्वतःच्या अडचणीत वापरू नका. डॉ आंबेडकरांचे नाव घेताना दलित अत्याचार, बौद्ध अत्याचार, महिला अत्याचार, दलित बजेट या विषयी बोला. ऊसतोड कामगार विषयी बोला? तुमचा सनातन धर्म, दलित, मुस्लिम यांच्यावर कसा अन्याय करतो हे पण सांगा. पुण्यात असताना कुठे आग लावली. सनातन धर्म म्हणून मुस्लिम बंधूना कसे छळले ते ही थोडक्यात सांगा.
त्यामुळे डॉ आंबेडकर यांचे विचार हे सनातन धर्म व मनुस्मृती गाढण्यासाठी आहेत.आंबेडकरी विचार लोकशाही सदृढ करणारा महिला, शेतकरी, व बहुजन समाज यांचे अवमूल्यन रोखून समतेवर आरूढ होणारा आहे.सनातन ची गुलामी करणारा नव्हे हे ही लक्षात घ्या. सनातन धर्म,गोळवलकर, हेगडेवार व मनुस्मृती हाच तुमचा सनातन धर्म आहे.
आदरणीय राम सातपुते! त्यामुळे तुम्हाला जय भीम म्हणणे उचित ठरणार नाही त्याऐवजी सनातन धर्म की जय! सनातन की जय? असे म्हणणे योग्य आहे. धन्यवाद!