माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी व खरसुंडी येथे अवैध व बेकादेशीर पणे देशी दारूची विक्री करणाऱ्यावर आटपाडी पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, खरसुंडी येथे आरोपी शेखर चंद्रकांत मोहिते हा बेकादेशीरपणे देशी दारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

गळवेवाडी येथे आरोपी रामचंद्र ज्ञानू गळवे हा आरोपी स्वत:च्या घराच्या पाठीमागील बाजूस देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून आरोपी रामचंद्र ज्ञानू गळवे याच्याकडून ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
वरील दोन्ही आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ड) प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.