आटपाडी : हिवतड मध्ये विवाहतेचा हुंड्यासाठी छळ : पती, सासू,सासरे,नणंद,चुलत दीर यांच्या विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे माहेरुन टीव्ही ,फ्रिज व एक लाख हुंडयासाठी तसेच सोडचिट्टी दे म्हणत विवाहतेचा छळ करण्यात आली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात फिर्यादीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी हिचे लग्न हिवतड येथील तानाजी बाळू माळी यांच्याशी झाला होता. लग्नानंतर फिर्यादी हिला पती बाळु तानाजी माळी, सासरे तानाजी माळी, सासू वैजंता तानाजी माळी, दीर विठठल तानाजी माळी, नणंद कविता विलास शिंदे, चुलत दीर संदीप आनंदा माळी यांनी फिर्यादीस जाचहाट करुन शारीरीक त्रास देवुन माहेरुन टीव्ही,फ्रिज व एक लाख हुंडयासाठी तसेच सोडचिट्ठी दे असे म्हणुन फिर्यादीस वेळोवेळी मारहाण व शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली दिली आहे.

याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध ४९८अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ कोरवी करीत आहेत.