माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : आम. अनिल बाबर हे अपात्र होणार असून पुढचा आमदार हा शिवसेनेचा असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खास. संजय राऊत यांनी केले.
सांगली येथील सभेला जाण्यासाठी ते विटा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आम. अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडले. आम. अनिल बाबर यांच्या बाबर आडनावावरून बोलताना ते म्हणाले, मी जिथे जिथे जाता तिथे बाबरी पडते. माझ्या सभेला विद्यमान आमदारांनी स्पिकर परवाना नाकारला असून त्यांनी फाटली आहे. गावागावातील पाणी पुरवठा बंद केला असून येथून पुढे गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस असून महाविकास आघाडी बरोबर आहे. त्यामुळे येथील पुढे पाहत राहा, कारण हे आमदार अपात्र होणार आहे. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून दिले असून तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
विटा मार्गे सांगलीला जाता असताना जाता-जाता दगड नाहीतर वीट तरी मारू असा इशारा देखील त्यांनी आम. बाबर यांना दिला. यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांच्यासह मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.