सांगोला : सांगोला तालुक्यातील महूद (पवारवाडी) येथे पूर्व परीक्षेत नापास झाला म्हणून मुलास आईने रागावल्याने अल्पवयीन मुलगा गेला घर सोडून बेपत्ता झाल्याची नोंद सांगोला पोलीस ठाणे येथे झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महूद (पवारवाडी) येथे सोमनाथ पवार यांचे कुटुंबिय राहणेस आहे. त्यांचा मुलगा विराज हा फिनिक्स माध्यमिक विद्यालय, महूद येथे इ. ९ वी च्या वर्गात शिकत आहे. विद्यालयाच्या पूर्व परीक्षेत तो दोन विषयात नापास झाल्याने तो शाळेत जात नव्हता.

याबाबत विराज याला त्याची आईने त्यास शाळेत जायचे नाही तर घरी राहण्याचे असे सांगितले असता विराज पवार याने दिनांक २६/२/२०२३ रोजी सायंकाळ चार दरम्यान घरातून निघून गेला. सदरची माहिती विराजचे वडील सोमनाथ पवार यांना देण्यात आली.
सोमनाथ पवार यांनी कामावरून घरी आल्यावर शेजारी, आसपासच्या गावाच्या विराज याची चौकशी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कोठेही आढळून आला नाही. याबाबत सोमनाथ पवार यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे विराज हा अल्पवयीन असल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्यादी दिली असून विराज पवार हा कोणास आढळून आल्यास ९७६५०६०७४५ या मोबाईल क्रमांकावर संपूर्ण साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.