आटपाडी : नागालँड विधानसभेच्या दोन जागांवर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन आमदार निवडून आले असल्याने आटपाडीमध्ये RPI चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
नागालँड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार संपन्न झाले. यामध्ये आरपीआयचे दोन उमेदवारांचा विजय झाला. Y. लिमा ओनेन चँग यांनी नोक्सेन विधानसभेची जागा ( Noksen seat ) जिंकली आहे. तर इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे.

नागालँडमध्ये RPI चे दोन आमदार निवडून आले असल्याची माहिती समजताच आटपाडी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात RPI चे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना जिलेबी व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात म्हणाले, RPI चे दोन उमेदवार निवडून आल्याने महाराष्ट्रातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण झाली. येणाऱ्या काळात रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे आपणास दिसून येईल.
यावेळी RPI चे डॉ.उत्तम मोटे, शामराव ऐवळे, उत्तम बालटे, अमोल लांडगे, प्रकाश देशमुख, नवनाथ जावीर ॲड. नवनाथ सावंत, भिकाजी खरात, नितीन सागर, स्वप्निल चव्हाण, नामदेव खरात, रणजीत ऐवळे, समाधान खरात, विवेक सावंत, शरद वाघमारे, राजेश मोटे, विलास धांडोरे मारुती ढोबळे, विकास खरात उपस्थित होते.