माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक झाली असून याबाबत समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये प्रलंबित असणारे सेवापुस्तक भरविण्याचा कॅम्प लावणे. ठराविक शिक्षकांनाच वारंवार इतर शाळेत कामगिरीवर पाठविणे. प्रभारी केंद्रप्रमुखांची शिक्षकांना नाउमेद करणारी वागणूक थांबवून कार्यवाही होणे. प्रशासकीय जबाबदार असताना संघटनात्मक रोष मनात ठेवून पक्षपती करणाऱ्या प्रभारी केंद्रप्रमुखांना समज देवून काय्वाही करणे. इत्यादी बाबत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव, समितीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस नानासो झुरे, हैबतराव पावणे, शिवराज मुरकुटे आदी उपस्थित होते.