Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापुर: घेऊन जाणारा कंटेनर ३५ लाख ५३ हजार रुपयांची विदेशी बनावट दारू जप्त

0 82

कोल्हापूर : विदेशी बनावटीचा मद्यसाठा मुंबईच्या दिशेने घेऊन जाणारा कंटेनर पकडून ३५ लाख ५३ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी गावाजवळ सकाळी कारवाई केली. कंटेनरचालक दिनेश जेकनराम कुमार (वय ३०, रा. कावोकी बेरी, जि. बाडमेर, राजस्थान) याला पथकाने अटक केली.

 

पुणे बेंगळुरू महामार्गावरून एका सहाचाकी कंटेनरमधून विदेशी मद्यसाठा मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यानुसार तडवी यांनी निरीक्षक एस. जे. डेरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

Manganga

त्याची झडती घेताना विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळले. पथकाने ३५ लाख ५३ हजार २०० रुपयांचे मद्य आणि ११ लाख रुपयांचा कंटेनर असा ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कंटेनर चालक दिनेश कुमार याला अटक केली असून, मद्यसाठा कुठून आणला आणि कोणाला पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!