सोलापूर : सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली आहे. परंतू दुदैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रति क्विंटल १५०० रूपचे खर्च येतो, परंतू आज बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे.
शासनाच्यावतीने शेतऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे आणि यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबतचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना देण्यात आले.