Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक: मळीच्या टँकरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

0 198

सोलापूर : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शेतकऱ्याला मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. या धडकेत टँकरखाली चिरडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रानमसले (ता. उ. सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शुभम दयानंद गरड (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अर्जुन सेनमारे (वय ३४, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत. आनंदा विश्वनाथ गरड (वय ६७, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत आनंदा गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते.

याचवेळी टँकरचालकाने आनंदा गरड यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येेथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.