Latest Marathi News

BREAKING NEWS

 

दिलासादायक! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत केली ३९ कोटींची मदत

0 90

सोलापूर : उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना मदत केली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत कक्षाकडून ४८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

 

दरम्यान, पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी १० कोटी २७ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.