Latest Marathi News

BREAKING NEWS

२० वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला फसवले

0 687

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात ती गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २ ते २७ जानेवारी या कालावधीत कासारवाडी, चिंचवड येथे घडला. पृथ्वीराज जाधव (वय २०, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत पृथ्वीराज याने सोशल मीडियावर मैत्री केली. मुलीचा विश्वास संपादन करून तिला आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिला रूमवर नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुढीलपोलिस तपास करीत आहेत. (स्त्रोत्र : लोकमत ऑनलाईन)

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!