Latest Marathi News

BREAKING NEWS

 

गतिमंद युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली १५ वर्षांची शिक्षा

0 368

अकोला : गतिमंद युवतीचे लैंगिक शोषण करणारा आरोपी संतोष सीताराम इंगळे अकोट न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांच्या न्यायालयाने मंगळवारी साक्ष, पुराव्यांच्या आधारे १५ वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. हिवरखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील संतोष सीताराम इंगळे याने गतिमंद युवतीच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत, प्रवेश केला आणि युवतीवर लैंगिक अत्याचार केला.

 

 

न्यायालयाने आरोपी संतोष इंगळे याला भादंविचे कलम ३७६(२), (एफ) नुसार १५ वर्षे सश्रम कारावाास, २० हजार रूपये दंड, भादंवि कलम ३७६(२), (एल) मध्ये १५ वर्षे सश्रम कारावास, २० हजार रूपये दंड, भादंवि कलम ४५२ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास, १० हजार रूपये दंड, कलम ५०६ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास, १० हजार रूपये दंड, २० हजार दंडाची रक्कम न भरल्यास, आरोपीस प्रत्येकी तीन वर्षे अतिरिक्त कारावास, १० हजार रूपये दंड न भरल्यास, प्रत्येकी एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

 

याप्रकरणात हिवरखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२),(एल), (एफ) आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाने ११ साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.