Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक : डंपर चालकाकडून पोलिसालाच जीवे मारण्याची धमकी

0 523

पिंपरी : डंपर अडवला म्हणून दोघांनी भर रस्त्यात पोलिस अंमलदाराला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत पोलिसाचा खून करण्याची धमकी दिली.

 

अमित साखरे, प्रथमेश हांडे (दोघे रा. हिंजवडी, तसेच हायवा डंपर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोमनाथ दिवटे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस अंमलदार दिवटे हे हिंजवडी फेज दोन येथे कर्तव्यावर असताना आलेल्या हायवा डंपरला त्यांनी थांबवण्याचा इशारा केला. त्या कारणावरून डंपरचा मालक अमित आणि त्याचा मित्र प्रथमेश यांनी दिवटे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अमित याने शिवीगाळ करत, आमची गाडी अडवतो का, तुझा मर्डर करतो. मी हिंजवडीचा भाई अमित साखरे आहे. काढ रे हत्यार याचा मर्डर करून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.