डॉ.नितीन बाबर यांच्या ‘अर्थप्रवाह’ ला शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसिएशनचा राज्यस्तरीय कुसुमताई राजारामबापू पाटील ‘उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसिएशन (सुयेक) आणि बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये डॉ नितीन बाबर यांच्या ‘अर्थप्रवाह’ या पुस्तकास शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र असोसियशनचे अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कुसुमताई राजारामबापू पाटील ‘उत्कृष्ट ग्रंथ परितोषिक सुयेकचे माजी अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ अर्जुनराव महाडीक यांच्या हस्ते दिनांक २६ फ्रेब्रुवारी रोजी विटा येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सुयेकचे अध्यक्ष प्रा.डॉ. राहूल म्होपरे, माजी अध्यक्षा प्राचार्या डॉ.तेजस्वीनी मुडेकर, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.एम.जी. पाटील, शिवार्थ संपादक प्रा.डॉ. जयंत इंगळे, सचिव प्रा. संजय धोंडे, डॉ. प्रविण बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ बाबर हे सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सातत्याने त्यांचे शेती, ग्रामीण अर्थकारणावर संशोधनात्मक लेख वेगवेगळ्या वर्तमान पत्रात प्रकाशित होत असतात. म्हणूनच यावर्षी सुयेकमार्फत त्यांचा, सन्मानपत्र व रोख रक्कम देवून गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल माजी कुलगुरू योगेंद्र नेरकर, जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा.डॉ.भालबा विभुते, शिवाजी विद्यापीठ अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस. देशमुख जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ.विजय ककडे यांनी त्यांचे कौतुक केले आहे..
त्यांना ख्यातनाम अर्थतज्ज्ञ कै. प्रा.डॉ.जे.एफ. पाटील सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, उपाध्यक्ष ता.ना.केदार, प्रा.मा.पी.सी. झपके तसेच सचिव म.सि. झिरपे व इतर सर्व संस्था सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले, डॉ. मधूसुदन बचूटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर महाविद्यालयातील इतर सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन अधिक्षक पी.एस. शिंदे तसेच इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व चोपडी गावचे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.