माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळामार्फत विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोस्टर प्रेसेंटेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तर प्रश्नमंजुषेमध्ये 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे यांनी पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन केले तर विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा.प्रकाश हसबे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अंकुश कोळेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी विज्ञान मंडळाचे सदस्य डॉ. उत्तम मोटे, डॉ.धनंजय लोहार यांचे सहकार्य लाभले. वैश्विक उन्नतीसाठी वैश्विक विज्ञान या संकल्पनेवर आधारित सन 2022 23 या वर्षांमध्ये विज्ञान मंडळामार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच बीएससी भाग एक दोन व तीन या वर्गातील विद्यार्थी यांचा सहभाग होता.
