कर्तव्य : महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने लग्न कार्यातही पार पाडले कर्तव्य : उखाणा घेत केले वीज बिल भरण्याचे आवाहन : पहा व्हिडीओ
विजबील वेळेत न भरल्यामुळे महावितरणाच्या खात्याचा थकबाकीचा आलेख वाढतच जातो. विजबील वेळेवर न भरल्याने विज वितरण कंपनी आणि महावितरण मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण जाणवू लागते. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नसोहळ्यात बायकोचं नाव ऊखाण्यात घेऊन विजबिल भरण्याचंही आवाहन करणाऱ्या अभियंता अतुल पैठणकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.
“आयुष्यभरासाठी साथ देईल तो जोडीदार खरा, शीतलचं नाव घेतो सर्वांनी वीजबील भरा आणि सहकार्य करा.”, अशा उखाणा घेत विजबिल भरण्याचं नागरिकांना आवाहन करणाऱ्या महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांची तुफान चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून हजारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने आपल्या विविध प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
