एका दीड वर्षांच्या मुलीच्या मृतदेहावर बलात्कार झाल्याची भयंकर घटना गुजरातमध्ये घडली आहे. येथील थानगढ परिसरात ही घटना घडली असून विकृताचा शोध सुरू आहे.
या मुलीचा मृत्यू 25 फेब्रुवारीला झाला होता. गुजरात पोलिसांनी मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या हृदयात जन्मजात छिद्र असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. 25 तारखेला तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी तिचं दफन करण्यात आले.