उत्तरप्रदेश : देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे. आपल्याकडे लग्न जोरदार आणि उत्साहात केले जाते. लग्नात कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत, उत्तर प्रदेशमधील असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेश येथील औरेया परिसरात एका लग्नाची तक्रार पोलिसात केली आहे.
फतेहपूर जिल्ह्यातील अबू नगर गावातील रहिवासी असलेल्या सौरभचे लग्न सदर कोतवाली भागातील जारुहोलिया गावातील ग्यानबाबू यांची मुलगी संगीता हिच्याशी ठरले होते. मुलाच्या बाजूचे लोक थाटामाटात जारुहोलिया गावात पोहोचले. येथील जयमाला कार्यक्रम आटोपल्यानंतर अर्धे लोक आपापल्या घरी परतले होते. मुलाच्या बाजूचे नातेवाईक लग्नसमारंभात थांबले होते. दरम्यान मुलाकडच्या लोकांनी कमी सोनं पाहून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी वराची बहीण प्रियांका वर्मा वधूला शांत करण्यासाठी आली तेव्हा वधू संगीताने तिच्यावर हल्ला केला.
दरम्यान, दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. हा वाद पाहूण बाजूचे वधूच्या बाजूचे लोक एकत्र झाले, त्यांनी वराच्या बाजूच्या नातेवाईकांना ओलीस ठेवले. दरम्यान, या संदर्भात कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.