Latest Marathi News

BREAKING NEWS

लग्नामध्ये फोटो काढणे पडले महागात; ८० ह्जार रुपयाचे दागिने झाले लंपास

0 51

अकोला: येथील पोलिस लॉनमध्ये झालेल्या एका लग्न समारंभामध्ये अमरावती येथील वराच्या आईने स्टेजच्या बाजूला ठेवलेली पर्स चोरट्याने पळवली. या पर्समध्ये ८० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने होते. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.

अमरावती येथील टोपे नगरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी आनंद दमडुजी खुदरे (६७) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या डॉक्टर मुलाचे ७ फेब्रुवारी रोजी अकोल्यातील संजय इंगळे यांच्या मुलीशी लग्न झाले. हा लग्न समारंभ पोलिस लॉनमध्ये आयोजित केला होता.

Manganga

दुपारी १२ वाजता लग्न लागल्यानंतर नवरी-नवरदेव यांच्यासोबत पोलिस लॉंन येथील स्टेजवर दुपारी फोटो शूट सुरू असताना त्यांची पत्नी स्नेहा खुदरे हिने तिच्या गळ्यातील लेडीज पर्स (बॅग) स्टेजच्या बाजूला ठेवली होती. या पर्समध्ये मोबाइल, चांदीची गणेशमूर्ती, कृष्णमूर्ती, अन्नपूर्णा मूर्ती वजन अंदाजे ७० ग्रॅम, सोन्याचे पेंडाल वजन ४ ग्रॅम, सोन्याची चेन वजन ९ ग्रॅम असा एकूण ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. ही पर्स अज्ञातानेपळवली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!