Latest Marathi News

BREAKING NEWS

मार्चच्या सुरुवातीपासून वाढणार उन्हाचा तडाखा

0 30

नागपूर : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सूर्याचा पारा चढायला लागला असून, उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. दिवसाचे तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. रात्रीच्या गारव्याने उष्णतेचा समतोल राखला होता; पण आता किमान तापमानही चढायला लागले आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याचा तडाखा वाढेल, असा अंदाज आहे.

नागपूरला २४ तासांत दिवसाच्या तापमानात १.१ अंशाची घसरण हाेत रविवारी ३५.२ अंशाची नोंद करण्यात आली. तरीही हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशाने अधिक आहे. रात्रीचे तापमान १६.६ अंशावर असल्याने बाहेर काहीसा गारवा जाणवत आहे. पुढच्या आठवडाभरात किमान तापमान १९ अंशावर पाेहोचण्याचा अंदाज आहे.

Manganga

दिवसाचा पाराही ३८ अंशांवर पाेहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भातही ऊन तडकायला लागले आहे. ३८.२ अंशांसह अकाेला सर्वाधिक उष्ण ठरला आहे. यासह अमरावती व ब्रम्हपुरी ३७ अंशांच्यावर, चंद्रपूर व गोंदिया ३६ अंशांच्यावर तसेच वर्धा व यवतमाळ ३५ अंशांच्यावर पाेहोचला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीचा पाराही चढायला लागला असून, बाहेर गारवा असला तरी घरात उष्णता जाणवत असल्याने कुलर सुरू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!