माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू हा आटपाडी येथे उपचारा दरम्यान झाला. या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कटफळ ता. सांगोला येथील सिद्धेश्वर नामदेव काळेल वय ४ व द्रोपदी शिवाजी आटपाडकर वय ५० यांना अज्ञांत चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने धडक दिली. यामध्ये द्रोपदी शिवाजी आटपाडकर हिचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी सिद्धेश्वर नामदेव काळेल याला आटपाडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु त्याचा ही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत आटपाडी पोलीसात सदर गुन्हाची नोंद झाली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.