माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडीच्या आठवडी बाजारात झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारी प्रकरणी परस्पर फिर्यादी दिल्याने आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडीचा आठवडी बाजार हा शनिवारी भरत असतो. या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्री करण्यावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली. यावेळी झालेल्या मारहाण प्रकरणी या ठिकाणी पोलिसांना धाव घेत घेतली होती.

यामध्ये फिर्यादी मनीषा अनिल सागर यांच्या फिर्यादीनुसार आरोपी मायाप्पा काळे, मंगल मायाप्पा काळे, चंद्रकांत काळे, राहुल काबुगडे सर्व रा, मापटेमळा यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादी मायाप्पा काळे यांच्या फिर्यादी नुसार आरोपी हर्षद अनिल सागर, मनीषा अनिल सागर रा. सागरमळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.