माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड पालिका हद्दीतील लोखंडे पाटी येथे पंढरपुर रस्त्यालगत असलेल्या डाळींबीच्या बागेला अचानक लागलेल्या आगीमध्ये डाळींबाची सुमारे १२०० हुन अधिक झाडे आगीत जळुन भस्मसात झाल्याने अंदाजे २५ लाख रुपयाचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, देवापुर येथील शेतकरी अरुण राजाराम सावंत यांची म्हसवड पालिका हद्दीतील लोखंडे पाटी येथे डाळींब शेती आहे. या ठिकाणी त्यांनी १२०० डाळिंबाची झाडे लावली असुन सध्या या डाळींबीला चांगलीच फळ धारणा झाली होतो. गुरुवार दि.२३ रोजी अचानक या डाळींब बागेतील कुसळांनी पेट घेतल्याने डाळिंब बाग या आगीत जळुन भस्मसात झाली.

या सोबतच बागेतील एस.टी.पी. व पाईपलाईनही जळुन खाक झाल्याने सुमारे अंदाजे २५ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी अरुण सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान सदर आगीची माहिती मिळताच म्हसवड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आणली. मात्र आगीमध्ये सर्व डाळींब जळुन खाक झाली. सदर घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी यु.एन. आखडमल यांनी केला असुन झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी सावंत यांनी केली आहे.