माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : वर्षानुवर्षे दुष्काळ असणाऱ्या दिघंची येथील भक्तीचा मळा येथे टेंभू योजनेचे पाणी दखल झाले असून या भागातील दुष्काळ कायमचा संपला असून आमदार अनिलभाऊ बाबर, सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांनी हा परिसर सुजलाम सुफलाम बनणार असल्याचे मत अमोल मोरे यांनी व्यक्त केले.

शनिवारी दाखल झालेल्या टेंभूच्या पाण्याचे पूजन वार्ड नं 6 मधील ग्रामपंचायत सदस्य शेखर मिसाळ व देवेंद्र अप्पा पुसावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांच्यासह शेखर मिसाळ, देवाप्पा पुसावळे, श्रीरंग शिंदे, महादेव रणदिवे, संतोष ढोक, मानाजी ठोंबरे, सर्जेराव मोरे, अमोल पुसावळे, राजू पुसावळे, किरण पुसावळे, सावंता माळी, बाळासाहेब पुसावळे, नवनाथ पुसावळे, नामदेव जाधव, बबलू माईनकर, संग्राम मोरे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाण्यामुळे सागर मळा बंधारा, डुकर खिळा बंधारा, शिप्याचे लवण, माने मळा, पुसावळे वस्ती, ढोक वस्ती, भक्तीचा मळा या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच वर्षातून तीन आवर्तन शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.