माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : येथील विवाहतेचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या कारणावरून आटपाडी पोलिसात विवाहतेच्या फिर्यादीनुसार नवरा, सासू, सासऱ्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी विठ्ठलनगर येथील रहिवाशी असलेल्या मोनिका हिचे लग्न सुरूर ता. वाई, जि. सातारा येथील पवन अजित पवार याचेशी झाला होता. लग्नानंतर नवरा पवन पवार, सासू रंजना पवार व सासरे अजित पवार यांनी मोनिका हिच्याकडे माहेरहून दोन लाख रुपये घेवून म्हणून तिचा छळ सुरु केला.
मोनिका हिने सदरची बाब आई-वडिलाना सांगितली असता त्यांनी सोने मोडून आरोपी नवरा पवन पवार, सासू रंजना पवार व सासरे अजित पवार यांना पैसे दिले. परंतु अजून पैसे घेवून ये म्हणून मोनिका हिचा छळ करत तिला मारहाण करण्यात आली.

तसेच मोनिका हिचा पती पवन पवार याने मोनिकाचा भाऊ, मामा यांना फोन वरून शिवीगाळी करून त्यांना अश्लील मेसेज पाठविले आहेत. याबाबत मोनिका पवार हिच्या फिर्यादीनुसार पती पवन पवार सासू रंजना पवार व सासरे अजित पवार यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ ठोंबरे करीत आहेत.