सातारा : गाडी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून चार लाखांची स्कॉर्पिओ पळवून नेल्याची धक्कादायक घटना सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवनाथ नामदेव भुजबळ (३५, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर गाडी विक्रीची जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्कॉर्पिओ गाडीचा व्यवहार चार लाख दहा हजारांना ठरला. टोकन म्हणून त्या व्यक्तीने त्यांना दहा हजार रुपये पाठवले. उर्वरित पैसे तुम्ही साताऱ्यात गाडी घेऊन आल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानुसार भुजबळ हे दि. २१ रोजी रात्री साडेनऊ वाजता आपल्या तीन व्यावसायिक मित्रांसमवेत दोन गाड्या घेऊन साताऱ्यात आले.

बॉम्बे हे सर्वजण त्यांना भेटले. गाडीची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून त्यांनी गाडीची चावी घेतली. गाडीमध्ये भुजबळ यांचे दोन मित्र बसले. गाडी कोल्हापूरच्या दिशने ट्रायल घेण्यासाठी निघाली. गाडीचा वेग वाढवल्याने गाडीमध्ये बसलेल्या भुजबळ यांच्या मित्राला शंका आली. त्याने चालत्या गाडीतून उडी मारली, तर दुसरा व्यावसायिक मित्र गाडीतच बसला होता. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर गाडी कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेली. या प्रकारानंतर व्यावसायिक नवनाथ भुजबळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.