Latest Marathi News

BREAKING NEWS

२४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0 486

हैदराबाद : गेल्या काही वर्षांत देशात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्येही बहुतांश मृतांमध्ये कमी वय असलेल्या तरुणांचा समावेश होता. गुरुवारी असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशाल असं या मृत व्यक्तीचे नाव आहे.

हा पोलीस हवालदार हैदराबादमधील आसिफ नगर पोलीस ठाण्यात तैनात होता. गुरुवारी सकाळी विशाल व्यायाम करण्यासाठी जिममध्ये पोहोचला. व्यायाम करत असताना तो अचानक जमिनीवर पडला आणि पुन्हा उठलाच नाही. विशालला जमिनीवर पडताना पाहून जिममध्ये व्यायाम करत असलेले बाकीचे लोकही हैराण झाले. विशालला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.

Manganga

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. १६ वर्षीय भाची वृंदा त्रिपाठी २५ जानेवारी रोजी उषा नगर येथील छत्रपती शिवाजी शाळेत पायी जात असताना खाली पडली. पडल्यानंतर वृंदाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले पण तिला शुद्ध आली नाही. यानंतर, त्यांना घाईघाईने तिला रुग्णालयात नेण्यात आले.

परंतु त्यापूर्वीच तिचा श्वास थांबला होता. त्यानंतरही डॉक्टरांनी सीपीआर व इतर उपाय केले पण वृंदा शुद्धीवर आली नाही.शेवटी तिला मृत घोषित करण्यात आले असं स्थानिक रहिवासी राघवेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले. वृंदा पूर्णपणे बरी असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तिला कोणतीही समस्या नव्हती. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, कडाक्याच्या थंडीमुळे वृंदाला हृदयविकाराच झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!