पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापले आहे.
भाजपने कसब्याची जागा प्रतिष्ठेची केली असून पुर्ण ताकत पणाला लावली आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेमंत रासने यांच्या प्रचारात बोलताना शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, कसब्या मधील जनतेवर आम्हाला विश्वास आहे.

तर शरद पवारांवर टीका करताना म्हणाले शरद पवार यांच्या सभेला एका नेत्याने जे मुस्लिम लोकं आणा आणि मतदान काँग्रेसला करा ही जी हिंदुत्ववादी विरोधी भूमिका शरद पवार यांच्या सभेतून झाली.