Latest Marathi News

BREAKING NEWS

कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी

0 213

सोलापूर: कुंभारीकडे जाणारी दुचाकी अक्कलकोटवरून सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरखाली घुसली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन तरुण एकाच दुचाकीवरुन सोलापूरहुन कुंभारीकडे निघाले होते. त्यावेळी अक्कलकोटहुन सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट कंटेनर खाली जाऊन त्या कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Manganga

तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करत अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर मयत तरुणाचा मृतदेह शवविछेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!