‘आई कुठे काय करते’ ही सध्या मालिका एका रोमॅन्टिक वळणावर आली आहे. होय, आशुतोष आणि अरूंधती अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाला आहे. दुसरीकडे लग्नात विध्न घालण्याचे अनिरुद्धचे कारनामे देखील पाहायला मिळत आहेत. सध्या या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आशुतोषची नवरी बनण्यासाठी सज्ज असलेली अरुंधती सुंदर उखाणा घेताना दिसून येत आहे. आशुतोषही अरूंधतीसाठी उखाणा घेतो.

‘आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे..ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे…,’ असा सुंदर उखाणा अरूंधती आशुतोषसाठी घेते.
आशुतोषही अरूंधतीसाठी तितकाच सुंदर उखाणा घेतो. ‘बसलो होतो माझा मी माझ्याच विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एका रुक्ष क्षणी मोगऱ्याचा सुगंध दरवळला… अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला’, असा त्याचा उखाणा ऐकून अरूंधतीचा चेहरा खुलतो.