नाशिक : उद्योजक व्यापारीस्नेही सरकार आहे. त्यांच्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही. हे सरकारला माहिती आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने राज्याच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.
भविष्यातही महाराष्ट्र चेंबरचे सहकार्य राहणारच आहे. त्यामुळे काळजी करू नका, उद्योग व्यापाराला लागणाऱ्या सर्व सुविधा देऊन येत्या काही दिवसांत महाराष्ट्र एक क्रमांकाचे राज्य ठरेल. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत हा एक्स्पो सुरू राहणार असून, त्याची सकाळी ११ ते रात्री ९, अशी वेळ राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्रीअंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत.
मायटेक्स देशभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो भरविले आहे. गेल्या सात महिन्यांच्या काळात सध्याच्या सरकारने उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे.