भाजप खासदार किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, बदनामीकारक ट्विट केल्याप्रकरणी किरिट सोमय्या यांना संजय राऊतांनी एक नविन नोटीस जारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिनशर्त माफी न मागितल्यास कायदेशी कारवाई करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये २००० कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. ज्यावर भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.