Latest Marathi News

BREAKING NEWS

जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सहा नागपूरकर हायकोर्ट न्यायमूर्तींचा आज सत्कार

0 34

नागपूर : जिल्हा वकील संघटनेच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामधील सहा नागपूरकर न्यायमूर्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायालयातील सभागृहात दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सत्कारमूर्ती न्यायमूर्तींमध्ये न्या. अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. मुकुलिका जवळकर, न्या. अनिल पानसरे, न्या. यानशिवराज खोब्रागडे व न्या. वृषाली जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल व जिल्हा न्यायाधीश एम. एस. आझमी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे व महासचिव ॲड. मनीष रणदिवे यांनी ही माहिती दिली.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!