Latest Marathi News

BREAKING NEWS

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाने नवरीचा खुन करून स्वतःचे ही संपवले आयुष्य

0 78

रायपूर : लग्नाच्या एका दिवसानंतर नवरदेव आणि नववधूचा खोलीत मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वधू आणि वर रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी म्हणून एका खोलीत गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात नवरदेवाने नवरीचा खून केला. त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर वराने स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वत:लाही चाकूने मारून घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर टिकरापारा परिसरात खळबळ उडाली आहे. रिसेप्शनची तयारी करण्यासाठी ते दोघेही आपल्या खोलीत गेले होते. मात्र त्याच दरम्यान दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला आणि पुढे तो वाद टोकाला गेला.

Manganga

संतापलेल्या पतीने पत्नीचा रागाच्या भरात खून केला म्हटलं जात आहे. त्यानंतर त्याने स्वत: ला देखील संपवलं. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होते. पुढे घरच्यांच्या मर्जीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरामध्ये आनंदाचं वातावरण असताना ही घटना घडली. कुटुंबीयांनी जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. नवदाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!