Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक! तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

0 37

बीड : आईसोबत भीक मागत कफल्लक अवस्थेत फिरणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक व घृणास्पद घटना २१ फेब्रुवारी रात्री साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातील शौचालयात घडली. या घटनेनंतर पीडित मुलीला तातडीने उपचारकामी जिल्हा रुग्णालयात दाखल करुन पोलिसांनी चार तासांत अल्पवयीन आरोपीला पकडले.

 

पोलिसांच्या माहितीनुसार पीडित तीन वर्षांची मुलगी आईसोबत बसस्थानक व परिसरात भीक मागते. पीडितेची आई अंध असून २१ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आई बेकरीसमोर बसलेली होती. यावेळी तीन वर्षांची चिमुरडी तिच्या अवतीभोवती खेळत होती. विधिसंघर्षग्रस्त १४ वर्षीय मुलाने तिला २० रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेले. तेथे पडलेल्या एका गमछाने तिचे हात बांधले व त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले.

Manganga

पीडित मुलगी रडत आईजवळ गेल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यावर आईने रागात तिला दोन चापटा मारल्या व पुन्हा प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर माय- लेकी बसस्थानकामागील स्वच्छतागृहाजवळ अंधारात विसावल्या. शहर ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब सिरसाट, हवालदार मनोज परजणे, आशपाक सय्यद, अविनाश सानप, सुशेन पवार यांनी त्या दोघींचा शोध घेतला. मुलीवर तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!