पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनामध्ये एका आईने प्रियकरासोबत मिळून आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली. ही घटना कुंदखली गावातील आहे.
मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर जेव्हा लोकांनी त्याच्या आईला विचारणा केली तेव्हा महिला काहीच उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर लोकांनी तिला मारहाण सुरू केली आणि त्यानंतर तिने सांगितलं की तिच्या प्रियकराने मुलाचा जीव घेतला.
चौकशीतून समोर आले की आरोपी मफूजा पियादा 15 वर्षाआधी आपला पती अली पियादासोबत कोलकाता येथे आली होती. तिथे पती मजुरी करत होता.

यादरम्यान मफूजा पियादाचे अबुल हुसैन शेख नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू झाले.
स्थानिक लोकांनीच घटनेची सूचना पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून चौकशी सुरू आहे.